गुरूकृपा ग्रामीण पतसंस्था विषयी

संस्थापक - महेंद्र (आप्पा) लाड
उपाध्यक्ष : रयत शिक्षण संस्था, सातारा.
संचालक - सांगली जिल्हा मध्य. सह. बँक लि., सांगली.
संस्थापक - गुरुकृपा ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या., कुंडल.
संस्थापक - पार्वती लाड एज्युकेशन सोसायटी लि.कुंडल.
संस्थापक - डॉ. पतंगराव कदम विविध कार्यकारी सोसा.लि.कुंडल.
2017 साली मा. महेंद्र (आप्पा) लाड यांनी स्थापन केलेली गुरूकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था अगदी कमी कालावधीत 2017 साली स्वमालकीच्या वास्तूत स्थलांतर झाली. कुंडल सारख्या स्थापन झालेल्या गुरूकृपा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थातेला संपूर्ण नावलौकिक मिळाला. महाराष्ट्रातील अनेक संस्थेचे पदाधिकारी संस्थचे कामकाज पाहण्यास येतात. समाजाच्या विकासासाठी सहकार हि संकल्पना गुरूकृपा पतसंस्थेने ध्येय, निष्ठा, सातत्या, विश्वास, इमानदारी या पंचसूत्रीचा वापर लोकउपयोगी व समाज हिताची कामे करण्यासाठी केला आहे.
आपणा सर्वांचे स्वागत करताना व दि.३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल सादर करीत
असताना आपल्या संस्थेच्या ६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आपणांशी संवाद साधताना मला खुप आनंद होत आहे. सर्वप्रथम मी व्यक्तिशः व सर्व संचालक मंडळाचे वतीने आपणा सर्व सभासदांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो.
आपल्या संस्थेचे संस्थापक मा.श्री. महेंद्र (आप्पा) लाड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ६ वर्षामध्ये संस्थेने सामान्यातील सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी मदत करण्याचे कार्य आपल्या संस्थेने केलेले आहे, तसेच त्यांना समाजामध्ये पतवान म्हणून निर्माण करण्याचे धोरण आपण आपल्या संस्थे मार्फत केले याचा मला अतिशय आनंद व समाधान होत आहे. अहवाल सालात संस्थेने कौतुकास्पद प्रगती केलेली आहे. ठेवी, कर्जे व एकूण व्यवसायात भरीव वाढ झाली असून संस्थेची नफा क्षमता सुध्दा वाढली आहे. हे केवळ सभासद, ठेवीदार व कर्जदार, हितचिंतकाचे प्रचंड सहकार्य व मा महेंद्र आप्पांच्या
वरील विश्वासामुळेच घडू शकले आहे. त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार. संस्थेने आपली विश्वासार्हता सामान्य माणसांच्यामध्ये टिकविलेने संस्थेच्या ठेवीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. व्याजदरापेक्षा आपण गुंतवलेले पैसे सुरक्षित आहेत का ही बाब सामान्य ठेवीदारांना जास्त महत्वाची चाटते. या दृष्टीकोणातुन संस्थेने नियोजनबध्दरीत्या वाटचाल करून पारदर्शक कारभार व दूरदृष्टीने घेतलेले अचूक निर्णय यामुळे ही विश्वासार्हता वाढलेली आहे.
मागील काही कालखंडापासून शासनाच्या उदासिन धोरणांमुळे सहकार क्षेत्राला आलेली मरगळ व जागतिक कोरोना महामारी, आर्थिक मंदी दुष्काळग्रस्थ परिस्थिती व त्यानंतर आलेली पुरग्रस्त परिस्थिती अशा प्रतिकुल स्थितीमध्ये ही आपली संस्था उत्तरोत्तर प्रगतीच करीत आली आहे. या निमित्ताने सर्व सभासदांना, ठेवीदारांना आश्वासन देतो की, आस्ती संस्था जिल्हामध्ये एक आदर्श संस्था म्हणून नावारुपास येईल याची मी हमी देऊन संस्थेच्या प्रगतीचे विश्लेषण अहवाल सान २०२२-२०२३ च्या ताळेबंद, नफा-तोटा पत्रकावरुन दिसून येईल, तरी त्याला सर्वानुमते मंजुरी द्यावी, ही विनंती.